मयुरी आत्राम गोंडवाना विद्यापीठ उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार ने सन्मानित

0
640
Advertisements

चंद्रपूर – विद्यापीठ वर्धापन दिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच माजी उपपंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त पुरस्कार वितरण सोहळा आयोजन करण्यात आला होता.याप्रसंगी
गोंडवाना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट विद्यार्थीनी 2019–2020 पुरस्कार मयुरी सुरेश आत्राम ह्या विद्यार्थिनीला देऊन सत्कार करण्यात आला.
मयुरी सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली येथे मास्टर ऑफ शोशल वर्क पदव्युत्तर अभ्यासक्रमात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
शिबिरे,परिसंवाद, चर्चासत्र यात सहभाग घेऊन नृत्य, नाट्य, एकांकिका,पथनाट्य,संगीत,भारुड,पोवाडे ,फॅशन शो,वेशभुषा,वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,कथा कथन अशा संस्कृतिक आणि सामाजिक विविधांगी उप्रमात राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, आंतरमहाविद्यालयीन, महाविद्यालयीन अशा विविध स्तरावर उल्लेखनीय कार्य करत कौतुकास्पद यश मिळवले आहे. याव्यतिरिक्त विशेष गावात स्वच्छता मोहीम राबवून गाव स्वच्छ आणि हागणदारीमुक्त केले. मॅजिक बस,नेहरू युवा केंद्र,यीन समूह,सुराज्य जनजागृती युवाक्रांती संघटना यांच्यासोबत गाव सर्व्हेक्षण,वृक्षारोपण, झाडांना राखी बांधून वनसंवर्धन आणि वृक्षसंगोपण कार्य,नशामुक्ती अभियान,झरपट नदी स्वच्छता अभियान,फूट पाथ स्कूल, चंद्रपूर महानगरपालिका सोबत स्वच्छता आणि पथनाट्य जनजागृती मोहीम राबविली.कोल्हापूर आणि गडचिरोली येथील पूरग्रस्त लोकांसाठी एक देशसेवा म्हणून आर्थिक निधी,कपडे,धान्य गोळा करून पूरग्रस्त लोकांसाठी “एक हात मदतीचा – माणुसकीची मदत”उपक्रम राबवून समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत पूरग्रस्त लोकांपर्यंत मदत पोहोचवली.
इको प्रो सोबत “जंगल संवर्धन”विषयावर शॉर्ट फिल्म तसेच अनेक सामाजिक आणि वास्तव व्यथा मांडणाऱ्या विषयावर शॉर्ट फिल्म मध्ये उत्तम कार्य केले आहे.
भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर आणि सुराज्य जनजागृती युवाक्रांती संघटना यांच्या साथीने सामाजिक–सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव
बौद्धिक आणि शैक्षणिक उपक्रम,मार्गदर्शन कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजन करून लोकप्रकार आणि प्रबोधन माध्यमातून सामाजिक जनजागृती चळवळ राबविली.
स्वयंसिद्धा संस्था च्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे विविध शाळेतील किशोरवयीन मुलींना कराटे प्रशिक्षणाचे धडे दिले.
लॉकडाऊन काळात संगणकाचा उपयोग करून विविध विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
विवध ऑनलाईन सेमिणार सहभागत्च मिळवले.
यीन समूह चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आणि यीन राज्य वनमंत्री म्हणून उत्तमप्रकारे कार्यभार सांभाळला आहे.
सोबतच शिवछत्रपती आदर्श युवती महाराष्ट्र युथ आयडॉल अवॉर्ड 2020 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
केलेल्या सर्व कार्याचा सन्मान म्हणून मयुरी ची उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून यावर्षी विद्यापीठाने निवड केली.
विद्यापीठ कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, वृक्षभेट,प्रमाणपत्र देऊन मयुरी चा गौरव करण्यात आला.
यावेळी जीवन साधना गौरव पुरस्कार सत्कारमूर्ती सुप्रसिध्द समाजसेवक मधन धनकर आणि प्रा.ईश्वर मोहूर्ले प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित होते.
सर्व महाविद्यालयीन शिक्षक–शिक्षिका , मित्र मैत्रिणी, कुटुंब परिवार आणि मिळालेल्या यशासाठी सहकार्य आणि प्रोत्साहन दिलेल्या सर्व सामाजिक सांस्कृतिक,क्रीडा आणि शैक्षणिक शेत्रतील प्रियजनांचे मयुरी ने आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here