नागरिकांना सांडपाण्याचा त्रास, शिवसेना-युवासेनेने केले स्वखर्चाने नालीचे बांधकाम

0
334
Advertisements

दुर्गापूर –  कोरोना काळात समस्त जनता त्रस्त असतांना सोबतच वारंवार पडणाऱ्या अवकाळी पाऊसामुळे उर्जानगर ग्रामपंचायत वसाहतीतील समता नगर वार्ड क्रं.१ परिसरात लोकांच्या घराघरांमध्ये सांडपाणी जात होते ,या प्रभागात नाली नसल्यामुळे पाण्याचा जमाव होत असल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी होत असतांना या बद्दल ग्रामपंचायत मध्ये वारंवार निवेदन, तक्रारी देऊन सुद्धा या भागात दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील शिवसेना शाखाप्रमुख मनोज इटकर, यांच्या पुढाकाराने शिवसेना,युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वखर्चाने, लोकसहभागातून नाली चे बांधकाम करून सामाजिक दायित्व पार पाडले. शिवसैनिकांनी स्वत:या नालीचे बांधकाम करून येथील नागरिकांना या समस्येतून मुक्त करित त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे करित पुढाकार घेऊन एक आदर्श तयार केला त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे येथील नागरिकांनी कौतुक करून आभार मानले.यावेळी शिवसेना शाखाप्रमुख मनोज इटकर सोबत युवासेना तालुका चिटणीस सागर तुरक, युवासेना विभाग प्रमुख अश्विन देवतळे,आलोक चवरे, सुरेश जाधव, सोनु साहू, आकाश साळुंखे, धम्मदिप डाहुले, दिनेश नेवारे, दशरथ इटकर यांनी परिश्रम घेतले. या भागात हे युवक नेहमी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजभावी उपक्रम राबवित असतात यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे, महानगर प्रमुख प्रमोदजी पाटिल, तालुका प्रमुख संतोष नरूले, युवासेना जिल्हा समन्वयक प्रा.निलेश बेलखेडे , यांचे मार्गदर्शन सदैव लाभत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here