अभाविप वरोरा शाखेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

0
145
Advertisements

वरोरा :- 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिनचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे स्थानीक लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सॅनिटायजरचा वापर करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री व युवकांचे प्रेरणास्थान स्वामीं विवेकानंद व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ साखरकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे परिचय कु.दिव्या वाणी हिने करून दिले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविप नगर मंत्री गणेश नक्षिणे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. बंडावार सर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून
प्रा. संतोष निखाते सर यांनी
महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.

इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे… व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.

Advertisements

त्यांनी सुरू केलेल्या ‘हरीजन’ वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे. असे सरांनी सांगितले व गांधीजी च्या विविध विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला व मार्गदर्शन केले. याचं कार्यक्रमचे दुसरे प्रमुख वक्ते श्री. दामोदरजी व्दिर्वेदी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित विविध गोष्टी सांगितल्या व त्यांच्या जीवनातील काही किस्से सुद्धा सांगितले. त्या मधून एक
वीज वाचवण्यासाठी काळोखात हा एक किस्सा आहे.

कामराज योजनेमुळे मंत्रीमंडळातील अनेकांना डच्चू देऊन पक्ष कार्यासाठी जुंपण्यात आले होते. या योजनेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री यांचीही नेहरुजींच्या मंत्रीमंडळातून गच्छंती झाली. त्यादिवशी कुलदीप नायर हे लाल बहादूर शास्त्री यांना भेटायला भेटायले गेले.शास्त्रीजींच्या बंगल्यात संपुर्ण काळोख पसरला होता. लाल बहादूर शास्री दिवानखान्यात बसले होते. केवळ तिथलेच लाईट सुरु होते. इतर दिवे का बंद केलेत. हा प्रश्न विचाल्यावर शास्त्रींजींनी उत्तर दिले. आता मी मंत्री राहीलो नाही. त्यामुळे हे विद्युत बिल मलाचं भरावे लागेल. ते मला परवडणार नाही. त्यामुळे आवश्यक तेवढी विज वापरायचे मी ठरवले. अशा विवीध प्रकारचे किस्से व त्यांचे कार्य सांगितले व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे शेवट पसायदाने करण्यात आले व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन लोकेश रुयारकर यांनी केले. कार्यक्रम मध्ये सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले व कार्यक्रम दरम्यान सर्वांनी मास्क चे वापर सुद्धा केले. कोविड 19 च्या सर्वं नियमाचे पालन करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. या कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी अभाविप जिल्हा समिती सदस्य शकिल शेख , महाविद्यालय प्रमुख कुणाल घुमे , अंकित मोगरे, तृप्ती गिरसावळे, छकुली गेडाम, प्रीतम निमकर, यांनी अथक परिश्रम घेतले. व या कार्यक्रमात अभाविप सदस्य व कार्यकते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here