गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची शासनाने त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून अधिकारी,कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप असून सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर गेल्या 30 सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषणाला बसले आहे.उपोषणाला आज 4 दिवस लोटूनही शासनप्रशासनाने अजूनही समाधानकारक दखल घेतलेली नाही.उपोषणकर्ताची प्रकृती खालावली पण स्थिर आहे.शिवसेना, भाजप,मनसे,आरपीआय आठवले व कवाडे गट पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवित आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरूवात केली आहे.दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी कोरपना तहसीलदार यांनी उपोषणकर्ता मदन बोरकर यांना “उपोषण मागे घ्या, चौकशी करण्यात येईल,सध्या कोरोना संकट सुरू आहे,असे म्हणत जिल्हा प्रशासन अधिकारी,नगरपालिका विभाग जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचे चौकशी संबंधी आश्वासन पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.” मात्र बोरकर यांनी तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणत पत्र घेण्यास नकार दिला.मी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.सदर प्रकरणासाठी चौकशी समितीची नेमणूक करा,किती दिवसात करता हे उल्लेख करा नंतरच मी उपोषण सोडणार अन्यथा नाही अशी भूमिका घेतली.एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसलेले शिवसेना,भाजप नगरसेवक व मनसे,आरपीआय कवाडे आणि आठवले गटाच्या नेत्यांनीNews34 पुढे काय प्रतिक्रिया दिली पहा हा व्हिडिओ.