मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याला कांग्रेसने मारले शेण

0
312
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्घुस :- उत्तरप्रदेश येथे मनीषा वाल्मिकी या दलीत समाजातील मुलीवर अत्यंत क्रूररीत्या सामूहिक बलात्कार करण्यात आला.
तिची जीभ तोडली पाठीच्या कणाच्या हाड मोडण्यात आले.

Advertisements

या अमानुष घटनेनंतर तब्बल आठ दिवस गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.
पंधरा दिवसा पर्यंत तिला उपचार मिळू दिले नाही.
मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबियांना घरात डांबून रात्री तीन वाजता बळजबरीने तिच्यावर अंतीमसंस्कार करण्यात आले.यानंतर तेथील डीएमने कुटुंबातील लोकांना तोंड बंद ठेवण्यासाठी धमकविले.
त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले हे सर्व अत्याचार बलात्कारातील आरोपींना वाचविण्यासाठी करण्यात आले.
या अमानवीय अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची सांत्वन करण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी वाढेरा हे हाथरस येथे जात असतांना उत्तरप्रदेश पोलिसांनी मुख्यमंत्री योगीच्या आदेशानुसार त्यांना अडविले त्यांच्याशी धक्का – बुक्की देऊन खाली पाडले व अटक केली या दडपशाहीचे निषेध नोंदविण्यासाठी दिनांक 03 ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्यालया समोर योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनतर्फे शेण मारून व योगी शासन मुर्दाबादचे नारे देऊन निषेध नोंदविला
सदर आंदोलन घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्यातर्फे करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते शेषरावजी ठाकरे(माजी सरपंच), जयंताजी जोगी (माजी जीप सदस्य)शमरावजी बोबडे,इंटक नेते लक्ष्मण सादलावर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती (SC) सेलचे अध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर, युवक नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, शेखर तंगडपल्ली, रिक्की सोदारी , विशाल नागपुरे, सुनील पाटील तर महिला काँग्रेस तर्फे सौ.सरस्वती पाटील, सौ.पदमा त्रिवेणी, अमीना बेगम शेख, सौ.संध्या मंडल, सौ.संगीता ताई बोबडे, श्रीमती दुर्गा पाटील,रोमा सोदारी,अरुणा रवी,सौ.रामेशवरी गोदारी,कौशल्या माणुसमारे, सुनंदा क्षिरसागर, सौ.रेखा रेगुंडावार,ताराबाई बोबडे,सारुबाई गोदारी, अरुणा कापरे,रुपा गोदारी,सोनी गोदारी,सौ.ज्योत्स्ना पिंपटकर, सौ.रिया पिंपटकर,पद्मावती कुक्का, श्रीलता सोनीरी,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here