माजी आमदार अँड.धोटे यांची उपोषण मंडपाला भेट

0
272
Advertisements

 

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची शासनाने त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,आधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी 30 सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे.बोरकर यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून उपोषणाच्या आज चौथ्या दिवशीही शासन प्रशासनाने याची अजूनही योग्य तो दखल घेतलेली नाही.उपोषणकर्ता बोरकर यांची प्रकृती खालावत असून समर्थन देणाऱ्यांची मालिका सुरूच आहे.अनेकांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समर्थन जाहीर केले आहे.तसेच भाजप,शिवसेना नगरसेवक,मनसे,आरपीआय(आठवले गट),आरपीआय (कवाडे गट) पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा देत एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरूवात केली आहे.राजूरा विधानसभाचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी आज उपोषण मंडपाला भेट देऊन बोरकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.शहरात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाटत असताना नगरपरिषदेकडून नियोजन शुन्य कारभार सुरू आहे.याची संपुर्ण जबाबदारी संबंधित दोषींवर ठेवण्यात यावी आणि तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी माजी मंत्री,आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदनातून करणार असल्याची माहिती अँड.धोटे यांनी News34 ला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here