“माझे कुटुंब,माझी जबाबदारी” मोहिम, उप जिल्हाधिकारी कन्हाळगावात

0
293
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” या मोहिमे अंतर्गत उप जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागामार्फत भाजप तालुकाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर यांच्यासह कुटुंबाची तपासणी करण्यात आली.संपुर्ण रिपोर्ट नॉर्मल असल्याने हिवरकर कुटुंब पुर्णपणे फिट असल्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या मोहिमेत उप जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी राजूरा,तहसीलदार कोरपना,संवर्ग विकास अधिकारी कोरपना,विनोद नवले सरपंच व सहकारी प्रमुख्याने उपस्थित होते. उप जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सहकाऱ्यांसोबत कन्हाळगाव तसेच हिवरकर कुटुंबाला भेट दिली असता त्यांचे कौतुक होत आहे. गावकर्‍यांनी सुद्धा “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला.आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here