ह्या देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रकार – आमदार सुभाष धोटे

0
184
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात गडचांदूर येथील बाबुराव शेडमाके चौकात केंद्र व उत्तर प्रदेश सरकाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध सभा घेण्यात आली.राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.उत्तर प्रदेशातील “हाथरस” येथील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहूल गांधी व राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात आली.काँग्रेस सारख्या देशातील जुन्या प्रमुख विरोधी राष्ट्रीय पक्षातील मुख्य नेत्याला अशा प्रकारची वागणूक म्हणजे देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रकार असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी निषेध नोंदविताना म्हटले.दूरदर्शन वरील अभिनेत्रीला विशेष महत्त्व असून सामान्य लोकांना पायदळी तुडवण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत असल्याचाही आरोप आमदार धोटे यांनी केला.
दरम्यान केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी विरोधी बिल मंजूर केले.या बिलामुळे देशातील शेतकऱ्यांचे खच्चीकरण होणार असून व्यापारी वर्गाला लाभ देणारे हे बिल असून यामुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व सुद्धा धोक्यात येणार आहे.व्यापारी वर्गाला मनमानी करून शेतकऱ्यांची लूट करण्याचा परवानाच जणू या कायद्यामुळे देण्यात आला आहे.त्यामुळे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी या बिलाविरुद्ध आवाज उठवून शेतकरी विरोधी बिल रद्द करण्याची मागणी करण्याचेही आवाहन आमदार धोटे यांनी यावेळी केले आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोहितकर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विठ्ठलराव थीपे,नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,गटनेता विक्रम येरणे,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी,पापय्या पोन्नमवार, नोगराज मंगरूळकर,शिवकुमार राठी, बापूराव गोरे,माजी सरपंच बाबाराव पुरके,आरोग्य सभापती सौ.जयश्री ताकसांडे,नगरसेवक राहूल उमरे,अरविंद मेश्राम,राजूरा विधानसभा युवक काँग्रेस महासचिव मकसूद सय्यद,उमेश राजूरकर,अहमद भाई,युकाँ तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे,काँग्रेस शहराध्यक्ष संतोष महाडोळे,युकाँ शहराध्यक्ष रुपेश चुधरी,प्रितम सातपुते,रोहित शिंगाडे,विवेक येरणे,प्रवीण झाडे,बळीराम ताडे,मारोती जुमनाके,सचिन भोंगळे,संतोष देवाडकर, कौस्तुभ येरणे,श्रीकांत धर्मापूरी व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन युकाँचे माजी विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर तर आभार गटनेता विक्रम येरणे यांनी मानले.आंदोलना दरम्यान पोलिस बंदोबस्त चोख होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here