शशांक नामेवार उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

0
302
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूरचे मुख्य लिपीक “शशांक शंकरराव नामेवार” यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने(संलग्नित महाविद्यालये) सन्मानित करण्यात आले आहे.2 ऑक्टोंबर रोजी संपन्न झालेल्या विद्यापीठाच्या 9 व्या वर्धापन दिनी आयोजीत पुरुस्कार वितरण सोहळ्यात नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी आणि कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.शशांक नामेवार हे महाविद्यालयातील उपक्रमशील आणि क्रियाशील लिपिक असून अनेक उपक्रमात आणि कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.महाविद्यालयातील विविध विस्तार कार्य एन.एस.तसेच समाजोपयोगी कार्यामध्ये नामेवार यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.त्यांचा अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची निकटचा संबंध असून अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले, तुळशीरामजी पुंजेकर,नामदेवराव बाबडे, नोगराज मंगरूळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजयकुमार सिंह, डॉ.दुधगवळी, डॉ.बिडवाईक, डॉ.गोरे, डॉ.गायधनी, डॉ.बेलोरकर, डॉ.कु.मसराम, डॉ.सिह, प्रा.करंबे, नळे, उरकुडे, भोयर, बुऱ्हाण, टेकाम, पोहाणे, चांदेकर,पांडे,कुलमेथे इत्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here