चंद्रपूर – जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आरोग्य व्यवस्थेचा अभाव हे साऱ्यांनाच या कालावधीत बघायला मिळाले.
मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी यांना ज्यावेळी कोरोना झाला त्यांनी मात्र स्वतःचे उपचार हे खाजगी हॉस्पिटलला केले मात्र जनता शासकीय रुग्णालयात बेड साठी फिरत होती.
शहरातील सामाजिक कार्यकर्ता व माजी नगरसेविका नाहीद काझी यांनी नागरिकांसाठी नव्हे तर चक्क जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्यासाठी बक्षीस स्पर्धेचं आयोजन केलं या स्पर्धेत 50 हजार रुपयांचं बक्षीस आहे मात्र एक अट त्यांनी ठेवली आहे ती म्हणजे जिल्ह्यातील खासदार किंवा आमदार दुर्भाग्याने कोरोनाच्या विळख्यात सापडले तर त्यांनी उपचार शासकीय रुग्णालयात दाखल होऊन करावे.
म्हणजेच त्यावेळी तरी आपल्या जनप्रतिनिधी यांना जनतेच्या संवेदना कळेल, रुग्णालयात काय व्यवस्था आहे, नागरिक संतुष्ट आहे काय याबाबत आपल्या खासदार व आमदार यांना चांगली जाणीव होणार, जर त्यांनी स्वतःचा उपचार शासकीय रुग्णालयात घेतला तर ते 50 हजार रुपये बक्षिसांचे विजेते असणार.
नाहीद काझी यांनी या बक्षीस योजनेचे फलक संपूर्ण शहरात लावले आहे, जनप्रतिनिधी यांनी साहसिक निर्णय घेत शासकीय रुग्णालयात कोविड वर उपचार घ्यावे अशी मागणी काझी यांनी केली आहे.