चंद्रपुरात कांग्रेस विरुद्ध कांग्रेस

0
981
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना महामारी मुळे जनतेची होत असलेली असुविधा कारणास्त *राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंती चे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालया समोर काँग्रेसचे युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
चंद्रपूर जिल्हा हा मागील दीड महिन्यापासून कोरोना ग्रस्त झाला असून या रोगाचे प्रमाण शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दर दिवशी २०० ते ४०० च्या रेंज मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे. दरोरोज ५ पेक्षा जास्त लोक कोरोना मुळे मृत्युमुखी पडत आहे. शासकीय मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात फक्त १६० ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे.त्यामुळे १८ ते २० खासगी रुग्णालयाना कोरोना पेशंट घेण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु सर्व साधारण जनतेला २ ते ३ लाख रुपये लागणारा खर्च परवडणारे नाही. हे सर्व श्रुत आहे. परंतु पालकमंत्रीनी १५ आगस्ट स्वतंत्रदिनी आपल्या भाषणातुन ३०० ऑक्सिजन बेड व व्हऍन्टीलेटर शासकीय रुग्णालयात तसेच सैनिक शाळेत ४०० बेड, ४० अंबुलन्स, औषधीचा मूलभूत साठा व डॉक्टर, इतर स्टाफची ताबडतोब भरती करण्याची घोषणा करून दीड महिना लोटला नंतर सुद्धा काहीच उपाययोजना केले नाही. आणि वाढलेल्या पॉझिटिव्ह पेशंट घरीच कोरेन्टाईन करण्याचा धडका सुरू केलेला आहे. या मुळे सर्व साधारण जनतेचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेचा कमतरतेमुळे मेडिकल कॉलेज चे डीन, शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन व त्यांचे सहयोगी हतबल झालेले आहे.
जिल्हा प्रशासन व पालक मंत्री ही बाब गांभीर्याने घेतले नसल्याचे सिद्ध होत आहे. यात भर म्हणून वारंवार जनता कर्फ्यु चे सोंग करून गोरगरीब जनतेची व कोरोना ग्रस्त रुग्णांची मुस्कर दाबी होत आहे. याचा निषेधार्थ गांधी जयंतीच्या शुभमहूर्तावर विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, जिल्हा चंद्रपूर, जिल्हा युवक काँग्रेस, ISUI जिल्हा चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेस(इंटक) च्या वतीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालया समोर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केले व ७०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था त्वरित करण्याचे आग्रह धरला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस मधील गटबाजीचा जणू इतिहासच आहे, कांग्रेस म्हणजे कधी न संपणारी गटबाजी, या न त्या कारणावरून नेहमीच विरोधात्मक गटबाजी बाहेर पडत असते.

Advertisements

कोरोना काळात जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडली, प्रशासनाने वाढत्या कोरोना बाधितांवर नियंत्रण करायला हवे होते परंतु तसे काही झाले नाही, नियंत्रण तर सोडा प्रशासना ऐवजी चंद्रपुरात खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू झाले, मात्र प्रशासन फक्त जनता कर्फ्यु लावत बसला.

याप्रसंगी चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री करण पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, मनपा नगरसेवक अशोक नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे, मजदूर काँग्रेसचे वसंत मांढरे, रामदास वागदरकर, अजय मानवटकर, सागर बालकी, वीरेंद्र आर्या, अनिल तुंगडीवार, गजानन दिवसे, बी. के मुन, युवक काँग्रेसचे अँड.पवन मेश्राम, चेतन गेडाम, दुर्गेश चौबे, प्रतीक तिवारी, जॉन चालूरकर, अँड. प्रिती शहा, शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here