शिवसेना,भाजप, मनसेचे 3 ऑक्टोम्बरला “लक्षवेध” आंदोलन

0
607
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची शासनाने त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,आधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी 30 सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे.बोरकर यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून उपोषणाचा तीसरा दिवस लोटला आहे.शासन उपोषणाला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट दिसत असून याकडे शासनप्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या 3 आक्टोंबर रोजी शिवसेना,भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी तसेच मनसे व इतर पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपोषण मंडपात एक दिवसीय लक्षवेध आंदोलन करणार असल्याची माहिती News35 ला देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here