Advertisements
कोरोना बातमीपत्र
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 10753 झाली आहे. यापैकी 6729 बाधित बरे झाले आहेत तर 3862 जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारी एकूण 239 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये रामनगर राजुरा येथील 59 वर्षीय पुरुष, सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष, सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष, नवरगाव , सिंदेवाही येथील 63 वर्षीय महिला, महात्मा गांधी वॉर्ड बल्लारपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधितांचा मृत्यू झाला मृतक बाधितांला कोरोनासह, न्यूमोनिया व श्वसनाचा आजार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 153 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.