राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त महापौरांनी वाहिली आदरांजली

0
118
Advertisements

चंद्रपूर २ ऑक्टोबर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ वी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११७ व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालय येथे २ ऑक्टोबर रोजी मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते प्रतिमेला तसेच पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्यांच्या विचारांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यांचे विचार आम्हाला समृद्ध होण्याच्या दिशेने सतत मार्गदर्शन करत असतात तर लालबहादूर शास्त्री हे विनयशील आणि कणखर होते. त्यांनी नेहमीच साधेपणा जपला आणि देशाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वाहिले. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आठवून आम्ही त्यांच्या जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो अशा शब्दांत मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आदरांजली दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबरला झाला. दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी संपूर्ण देशात गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी केली जाते. तसेच संपूर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन (International Day of Non Violence) म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर श्री. राहुल पावडे, आयुक्त श्री. राजेश मोहिते, उपअभियंता अनिल घुमडे व महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here