प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्गुस – दिनांक २ आॅक्टोंबर ला घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राहुल गांंगुर्डे यांना निवेदन देऊन हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा द्या अशी मागणी घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्षा सौ.किरणताई विवेक बोढे यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस गावातील एक १९ वर्षीय मुलगी आपल्या शेतात जनावरांना चारा आनण्यासाठी गेली असता चार मानसिक विकॄतीच्या नराधमांनी सामुहिक रित्या लैंगिक अत्याचार करुन तिची जिभ कापली व मानेवर गंभीर जखमा केल्या जिवे मारण्याचा प्रयत्न केला ति रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी आढळुन आली. तिला उपचार साठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले मात्र मॄत्युशी झुंज देतांना उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मॄत्यु झाला. मानवी समाजाला कलंकित करनारी घटना घडल्याने समाज मन सुन्न झाले आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना नाही घडल्या पाहिजे प्रत्येक मुलगी समाजात सुरक्षित राहली पाहजे. अशा प्रकारच्या घटनांना अंकुश लावण्यासाठी आरोपींना तात्काळ फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.
घुग्घुस येथील महिलांचा प्रयास सखी मंच हे महिलांच्या न्याय हक्का साठी लढणारा मंच आहे.
महिला वरील झालेल्या अत्याचारासाठी नेहमीच घुग्घुस प्रयास सखी मंचच्या वतिने पुढाकार घेऊन आवाज उठविला आहे.
निवेदन देतांना घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्षा किरणताई बोढे, चंद्रपुर जिप महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, माजी ग्रापं सदस्या सुचीताताई लुटे, वैशाली ढवस, पुजा दुर्गम, निशा उरकुडे, वसुधा भोंगळे, सुनिता पाटील, सुनंदा लिहितकर, जया जामदार, किर्ती ठाकुर व शुभांगी किनेकर उपस्थित होते.