चंद्रपुर :- आम आदमी पार्टी द्वारा लॉक डाउन काळातील विजबिल सरसकट माफ व्हावे म्हणून राज्यातील महाविकास आघाडी च्या सरकारला वारंवार निवेदन देऊन वारंवार आंदोलने करून झाल्यानंतर सुद्धा सरकार बहिरे झाल्याची जाणिव आम आदमी पक्ष चंद्रपुर महानगर ला झाल्यानंतर पार्टीने मुख्यमंत्री म.रा. श्री उद्धवराव ठाकरे यांचे विरोधातच जनतेसोबत धोकाधडी केली म्हणून पोलीस एफआयआर करण्याचे ठरविले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथा घ्यायच्या; “जानता राजा” म्हणून नावा समोर बिरुद लावायचे;आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित असलेलं “रयतेच राज्य म्हणून सत्ता हातात घ्यायची आणि सत्तेवर आल्यानंतर #COVID19 च्या लॉक डाउन काळातच “वीजबिल 30%वाढ करायची अशा नालायक सरकारचे मुख्यमंत्री श्री उद्धवराव ठाकरे यांचे विरुद्ध “आज शांती अहिंसेचे पुजारी स्व महात्मा गांधीजी आणि पूर्व प्रधानमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री यांचे जन्मदिनी/जयंतीला यांचे प्रतिमेला अभिवादन करून चंद्रपुर सिटी पोलिस स्टेशनमध्ये,रामनगर,महाकाली, बंगाली कॅम्प इत्यादी “पोलीस ठाण्यात🅰️🅰️🅿️ चंद्रपुर महानगर द्वारा एफआयआर दाखल करण्यात आल्या.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार
Advertisements