माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांची कांग्रेस पक्षात घरवापसी

0
755
Advertisements

चंद्रपूर –

विधानसभा निवडणुकी दरम्यान कांग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांनी भाजपात प्रवेश केला होता, आता पुन्हा वर्षभरात त्यांनी घरवापसी करीत पुन्हा कांग्रेस पक्षात प्रवेश केला.

Advertisements

महात्मा गांधी जयंती आणि लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आज भाजपचे नेते प्रवीण पड़वेकर, मंगेश डांगे, गौस खान, आणि आवाज संघटनेचे नीलेश ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मा. पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आणि रितेश(रामु ) तिवारी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here