Advertisements
चंद्रपूर – उत्तरप्रदेश येथील हाथरस व बलरामपूर येथे घडलेल्या अमानवीय अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात 1 ऑक्टोम्बरला बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव चंद्रकांत मांझी, संगठन मंत्री मुकद्दर मेश्राम, उपाध्यक्ष विशाल बोरकर, धर्मेश निकोसे, शहर अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार आदि कार्यकर्ता उपस्थित होते.