घनकचरा संबंधी तात्काळ विशेष सभा बोलवा

0
285
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
उपरोक्त विषयाला अनुसरून विनंती करण्यात येते की,आपल्या नगरपरिषद कडून युवा कल्याण सुशिक्षित बेरोजगार संस्था चंद्रपूर यांचा घनकचरा विलगीकरणाचा ठेका चालू आहे.परंतु त्याच्याकडून योग्य काम होत नसून शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.शहरातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे.त्यातील तक्रारकर्ता भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी सदर प्रकरणात उच्च स्तरीय चौकशीच्या मागणीसाठी 30 सप्टेंबर 2020 पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.तेव्हा तात्काळ विशेष सभा बोलावून नगरपरिषद मार्फत चालू असलेल्या युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याचा परवाना काळ्या यादीत समाविष्ठ करण्यासाठी विचार विनियम करून निर्णय घेण्याबाबतचा विषय,विषय सूचित घेण्यात यावा.अशाप्रकारे भाजपचे अरविंद डोहे व शिवसेनेचे सागर ठाकूरवार,धनंजय छाजेड व सौ.वैशाली गोरे या विरोधी पक्ष नगरसेवकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना पत्र देऊन विनंती केली आहे.आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here