Advertisements
चंद्रपूर – उत्तरप्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी नामक युवतीवर अमानवीय अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उसळले आहे.
चंद्रपूर महिला राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
या अत्याचारात सहभागी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली, राष्ट्रवादी कांग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी ही घटना म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी आहे अश्या विकृत आरोपींना फाशीची शिक्षा सुद्धा कमीच पडणार.
यावेळी माधुरी पांडे, सुमित्रा वैद्य, नीता पिंपलशेंडे व शीतल लोखंडे उपस्थित होते.