चंद्रपूर – सध्या राज्यात वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय कामासाठी घाट राखीव ठेवण्यात आला असून बाकी बांधकामासाठी आजही अवैध वाळूचा वापर होत आहे.
ही तस्करी थांबविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीने पुढाकार घेत जिल्हाधिकारी गुल्हाने यांना निवेदन दिले.
अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांनी आता वाळू घाटावरून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून एका ठिकाणी साठविण्याची कामे करीत आहे, यामुळे नागरिकांना बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूसाठी जादा किंमत मोजावी लागत आहे.
या तस्करी मुळे शासनाला कोट्यवधींचा फटका सुद्धा बसत आहे, त्यामुळे ही तस्करी लवकरात लवकर थांबविण्यात यावी अन्यथा भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय सचिव सुरेश ठाकूर व विदर्भ सचिव संजय अनेजा यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यात होणारी वाळू तस्करी थांबवा अन्यथा आंदोलन
Advertisements