जिवती येथील राकाँचे “लक्षवेध” आंदोलनाला यश

0
231
Advertisements

 

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जिवती तालुक्यातील पाटण येथील स्टेट बँक शाखेत दलालांच्या तावडीत कर्ज वाटप होत असल्याने अनेक शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून बँकेचे सतत हेलपाटे घालूनही खरीप हंगामासाठी कर्ज मागणीचे अर्ज बँकेला सादर करूनही वेळेवर कर्ज उपलब्ध होत नसल्याने संतापाची लाट उसळली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैय्यद आबीद अली,तालुका राकाँचे तालुकाध्यक्ष कैलास राठोड,गडचांदूर न.प.उपाध्यक्ष शरद जोगी,वाघू उईके,रफी़क निजा़मी यांनी शेतकऱ्यांसह पाटण पोलिस स्टेशन येथे धडक देऊन बैठा आंदोलन केले.ठाणेदार चौधरी यांनी बँक मॅनेजर यांना पाचारण करून आंदोलनकर्त्यांसह पोलिस स्टेशनमध्ये चर्चा घडवून आणली.बँकेत शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रकरण निकाली काढून 8 ते 10 दिवसात सर्व शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल.कोणताही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये बँकेकडून सहकार्य करण्यात येईल असा शब्द बँक मॅनेजर यांनी दिला.काही प्रकरणांमध्ये बनावटी सातबारा,नादेय प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने याची खातरजमा करण्यासाठी पत्रव्यवहार केला.मात्र संबंधितांकडून माहिती उपलब्ध होत नसल्याने कर्ज वाटपात विलंब झाला,शाखेत दोनच कर्मचारी असल्यामुळे विलंब होत असल्याची माहिती देत काही शेतकऱ्यांना नक्कीच त्रास झाला यापुढे दिवस निश्‍चित करून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येईल,काही दलालांचा वाटपात हस्तक्षेप झाल्याची माहिती मिळाली असून बँकेच्या कर्मचार्‍यांनी पैसे घेऊन कर्जवाटप केले हा आरोप काही दलालांमार्फत पसरविल्या गेला आहे आपल्या मागणीनुसार थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून गरजूंना कर्ज देण्यात येईल,शेतकऱ्यांनी दलालांमार्फत संपर्क करू नये असे आवाहन बँक मॅनेजर यांनी केले.अशाप्रकारे व्यापक चर्चेअंती आंदोलन मागे घेण्यातआले.यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here