विनापरवानगी सुरु असलेली बांधकामे थांबवा

0
737
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा
नांदा ग्रामपंचायतीचे हद्दीत नागरिक कुठलीही बांधकाम परवानगी न घेता घरबांधणी करीत अ‍ाहे मोठ्याप्रमाणात अनधिकृत घर बांधणीचे काम सुरु असतांनाही नांदा ग्रामपंचायत कारवाई करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते येथील उपसरपंचानेच सर्विसरोडवर अतिक्रमण करुन अवैध बांधकाम केल्याचे तहसिलदार व गटविकास अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत सिध्द झाले असून नांदा ग्रामपंचायतीच्या सत्तेची चाबी उपसरपंचाचे खिशात असल्याने प्रकरण रफादफा केले आहे रामअवतार नावधंर यांनी अर्ज करुन सर्व नागरिकांना सारखाच न्याय देण्याची मागणी केल्याने ग्रामपंचायतीने कारवाई करणे गरजेचे आहे

नांदा ग्रामपंचायतीच्या १३ जुन २०१८ रोजीच्या विशेष सभेत विनापरवानगी अनधिकृत बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याबाबतचा विषय ठेवण्यात आला होता सभेत सचिव पंढरीनाथ गेडाम यांनी ग्रामपंचायत अधिनियम सदस्यांना समजावून कारवाई करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते परंतु स्वत: उपसरपंचानेच अतिक्रमण करुन बांधकाम केले असल्याने आपल्यावरही कारवाई होण्याची शक्यता असल्याने सत्तचा दुरुपयोग करुन उपसरपंचाचे पुढाकाराने सभेने कारवाई करण्याऐवजी विनापरवानगी बेकायदा अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये असा ठराव पारीत केला यामुळे विनापरवानगी अनधिकृत बेकायदा बांधकामाना ब्रेक लागण्याऐवजी संरक्षण मिळाले याच ठरावाचा फायदा घेत नांदा येथील नागरिक घर बांधणी करिता परवागनी घेत नाही नावधंर यांचेवर नांदा ग्रामपंचायत कारवाई करीत नसल्याने प्रकरण कोर्टात गेले ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याल‍ा कारवाईसाठी चार दिवस उपोषणाला बसावे लागले होते नांदा येथे अनेक नागरिक विनापरवानगी बांधकाम करीत असल्याने नावधंर यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करुन संविधानाचे कलम १४ अन्वये सर्वांवर सारख्याच न्याय द्यावा भेदभाव करु नये गावातील इतर सर्व विनापरवानगीने सुरु असलेल्या बांधकाम समंधाने सर्वे करुन सर्वांवर सारखीच कारवाई करावी अशी तक्रार केली असुन काँग्रेसचे युवा नेता हारूण सिद्दीकी यांनी विना परवानगीने सुरू केलेल्या बांधकामा विरोधात ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर गप्प का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे आता नांदा ग्रामपंचायत कारवाई करणार की परत विनापरवानगी अनधिकृत बेकायदा बांधकामांना संरक्षण देणार हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here