यंदा गरबा नाहीचं , राज्य सरकारच्या नवरात्रोत्सवासाठी अधिसूचना जाहीर

0
599
Advertisements

चंद्रपूर – १७ ऑक्टोम्बर पासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसरा या सणांसाठी राज्यसरकार द्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.

दरवर्षी उत्साहात साजरा होणार नवरात्र उत्सव यंदा कोरोना संसर्गामुळे पूर्णतः नियमात बांधल्या गेला आहे, नागरिकांनी प्रशासनाने जाहीर केलेले नियम पाळून उत्सव साजरा करावा.

Advertisements

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी पालिकेची परवानगी आधी घेणे बंधनकारक असणार आहे, कोरोना मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासनाने सुसंगत असे मर्यादित मंडप उभारावे,  सार्वजनिक दुर्गा/शारदा देवी मूर्तीची उंची ४ फुट घरगुती देवीच्या मूर्तीची मर्यादा २ फूट असावी.

मूर्ती पर्यावरण पूरक असल्यास शक्यतो घरीच विसर्जन करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्याने स्थानिक प्रशासनाने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे. वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा, जाहिराती प्रदर्शित करून गर्दी जमा करण्याचा प्रयत्न करू नये, तसेच मण्डपस्थळी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रचार करावा.

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये, आरोग्य विषयक शिबिरे, रक्तदान आयोजित करावे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय संदर्भात जनजागृती करावी.  आरती, भजन व कीर्तन सारखे धार्मिक कार्यक्रम घेताना गर्दी होणार नाही याबाबत खबरदारी बाळगावी.

देवी दर्शनाची सोय जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन, समाज माध्यमांद्वारे करण्यात यावी, मंडप स्थळी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी, फिजिकल डिस्टनसिंग व स्वछतेचे नियम पाळावे, मास्क व सॅनिटायझर चा नियमित वापर करावा.

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये, विसर्जन करतेवेळी पारंपरिक आरती घरीच करावी, लहान मुलांनी व जेष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे.  मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थिती नसावी, यंदा रावण दहनाचा कार्यक्रम होणार नाही, करायचा असेल त्यांनी नियम पळून प्रतिकात्मक स्वरूपात करून किमान व्यक्तींना हजर राहण्याची मुभा राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here