गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समिती शाखा गडचांदूर व कोरपनाच्या वतीने याठिकाणच्या दोन्ही नगराध्यक्षांना मुस्लिम समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यासाठी देण्यात आले.सदर आंदोलन राज्यभर सुरु असून मुस्लिम समाज बांधव खासदार,आमदार, लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहे.मुस्लिम समाज आर्थिक,शैक्षणिक मागासलेपणा यामुळे संपूर्ण राज्यभर मुस्लिम समाजाची पिछेहाट झाली असून शासनामार्फत न्यायमूर्ती सच्चर आयोग डॉ.महमूद रहमान समिती यांनी शासनाला अहवाल सादर करून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाबद्दल सविस्तर अहवाल शासनाला सादर करून उपाययोजना सुचविल्या व न्यायालयाने देखील समाजाला शैक्षणिक प्रवाहात सहभागी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले मात्र राज्यकर्ते व शासनाच्या दुर्लक्षामुळे हा समाज सर्व क्षेत्रात मागासला आहे.मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी सैय्यद आबीद अली यांच्या नेतृत्वात नदीम शेख,मोहब्बत खान,शहाबाज अली,मसूद पटेल,नादीर कादरी,जब्बार शेख,मोबीन,रफीक शेख,समीर शेख,अब्दुल रशीद,समशेर यांनी कोरपना नगराध्यक्षांना निवेदन दिले तर गडचांदूर येथे मौलाना हसनैन रज़ा,सैय्यद कुतबूद्दीन,सैय्यद ज़ाकीर अली,सैय्यद मकसूद अली,सैय्यद मूम्ताज़ अली,सैय्यद अनीस कुरेशी,सैय्यद महेबूब अली,सैय्यद ईरशाद अली,राजू भाई कादरी,रफी़क निज़ामी,अनीस भाई चिनी,बिलाल निजामी,अहेमद भाई,बब्लू भाई,साहेब अली ठेकेदार,ईरशाद मिस्त्री,तनवीर शेख,शेरू भाई,वसीम बेग,कय्यूम खान,नासीर खान यांनी नगराध्यक्षांना निवेदन दिले आहे.सदरच्या दोन्ही नगराध्यक्षांनी निवेदन शिफारशीसह मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचे आश्वासन उपस्थित मुस्लिम बांधवांना यावेळी दिले आहे.
गडचांदूर व कोरपना नगराध्यक्षांमार्फत मुख्यमंत्र्यांना मुस्लिमांचे निवेदन
Advertisements