नवे शैक्षणिक धोरण 2020 वर होणार देशभरात विविध स्पर्धा

0
231
Advertisements
चंद्रपूर – केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर एका अखिल भारतीय स्पर्धेचे आयोजन विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान तर्फे करण्यात आले आहे. या संकेतस्थळच उदघाटन 11 सप्टेंबर ला दिल्ली येथे केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा हस्ते करण्यात आले व स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
        नववी ते बारावी, स्नातक ते स्नातकोत्तर आणि सामान्य नागरिक अशा तीन गटात ही स्पर्धा घेतली जाईल. प्रत्येक गटात ऑनलाइन प्रश्नमंजुषा आणि इतर पाच स्पर्धा घेण्यात येतील.मराठी भाषेसह निवडक 13 भाषा मध्ये ही स्पर्धा होणार आहे. 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्पर्धकांना सहभागी होऊन आपले साहित्य www. mynep.in या संकेतस्थळमध्ये पोस्ट करावे लागणार. भारत केंद्रित शिक्षण, समग्र शिक्षण, ज्ञानआधारित समाज, गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर या स्पर्धा बेतलेल्या राहतील. अशी माहिती विद्याभारतीचे विदर्भ संयोजक रोशन आगरकर यांनी दिली.
        *यात मिम पासून ट्विटर थ्रेडपर्यंत स्पर्धा राहणार*
विविध गटांसाठी नेहमीच्या स्पर्धाप्रमाणे इतर अभिनव स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मिम बनवणे, लघुपट(व्हिडीओ), ट्विटर थ्रेड, प्रधानमंत्री याना पत्र, यासोबतच शाळा,महाविद्यालय, शैक्षणिक संस्थान याना शैक्षणिक धोरण बद्दल शपथ मध्येही सहभागी होता येणार.यात विजेत्यांना विविध आकर्षक रोख बक्षीस,पुरस्कार व प्रमाणपत्र ठेवण्यात आले आहे. सहभागीना आपल्या सोशल मीडिया अकॉऊंट वरून पण सहभागी होता येणार आहे.याकरिता www.mynep.in या संकेतस्थळ ला नक्की भेट द्यावी आणि अखिल भारतीय स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी,पालक शैक्षणिक संस्थान यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रांत संयोजक प्रा.भागवत भांगे व चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here