वरोरा – नागपुर-चंद्रपुर महामार्गावरील वरोरा येथे पोलिसांनी नागपुर येथील रहिवासी अफसर साहेब खान (४९)) यांना अटक केली. यासह नागपुर जिल्ह्यायातुन आणले जाणारे एक देशीदारू व वाहन १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी रात्री १२:२२ वाजता दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात संपुर्ण दारु बंदी जाहीर केल्यापासून दारूची तस्करी वाढली आहे. पोलिसांनी कोट्यावधीची दारू जप्त करुन नष्ट केली आहे. असे असुनही, तस्कर शेजारील जिल्ह्यांमधुन चंद्रपूर येथे दारूची तस्करी करीत आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे एसडीपीओ डॉ.निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोराचे एसएचओ उमेश पाटील यांच्या नेतृत्वात खंबाडा आणि आनंदवन चौक नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान एपीआय राजकिरण मडावी, एपीआय राहुल पतंग, दीपक दुधे, प्रवीण रामटेके, प्रवीण निकोदेय, मोहन निषाद आदींनी नागपूर येथुन दारूने भरलेल्या पिकअपला उचलले. एमएच ३१ डीएस ५७६८ मध्ये देशी दारूची १०० पेट्या जप्त करून नागपुर येथील आरोपीस अटक केली आहे. दहा लाख रुपये किमतीच्या १०० पेट्या देशी दारू, ८ लाख रुपयांचे पिकअप वाहन आणि १३,००० हजारांचा व्हिवो कंपनीचा मोबाइल असा एकूण १८ लाख १३ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
त्याचवेळी झरीपटका नागपुर येथील रहिवासी विक्की मेश्राम आणि राजीव गांधी नगर नागपूर येथील शेख वहीद शेख हे फरार झाले. एसडीपीओ डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल पतंग या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.