जिवती स्टेट बँक मॅनेजरमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी

0
470
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यात नक्षलग्रस्त,अतिदुर्गम आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखला जाणार्‍या जिवती तालुक्यातील पाटण येथील भारतीय स्टेट बँक नेहमी वादात असून सध्याच्या परिस्थीतीत याठिकाणी मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याची ओरड सुरू आहे.कर्ज पास करण्यासाठी चक्क दलालांची नेमणूक करण्यात आली असून “कमीशन द्या,कर्ज घ्या” असे आरोप होत आहे.गेल्या चार महिन्यांपासून कित्येक गोरगरीब शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी हेलपाटे मारत असून बँक मॅनेजरची अरेरावी व कर्जाच्या अडवणूकीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे.नियम व आदेशाला तिलांजली देत शेतकऱ्यांना पीकर्जापासून वंचित ठेवणाऱ्या सदर बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी येत्या 30 सप्टेंबर रोजी पाटण पोलिस स्टेशनसमोर बैठा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासकीय यंत्रणा,बँक शाखांना दिले.मात्र जिवती तालुक्यातील पाटण बँकेच्या मॅनेजरची अरेरावी व मुजोरीने शेकडो शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून “आवबे लड्डू जावबे लड्डू ” ची वागणूक दिली जात असल्याचे आरोप होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बँकेच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागत असून आत आल्यावर “बाहेर जा,बाहेर जा” असे सांगीतले जाते.पीक कर्ज मागणीसाठीचे अर्ज धूळखात पडल्याने या भागातील आदिवासी,मध्यमवर्ग शेतकरी पीककर्जासाठी बँकेत चकरा घालून-घालून वैतागले असून महिन्यापासून शेतकऱ्यांनी मागणी केली असता दलालांच्या माध्यमाने कमीशन घेऊन कर्जाची प्रकरणे हाताळली जात असल्याचे आरोप अनेक आदिवासी शेतकर्‍यांनी केले आहे.जून महिन्यामध्ये मॅनेजरनी शेतकऱ्यांना मागितलेली सर्व आवश्यक ती कागदपतत्रांची पूर्तता करूनही कर्ज वाटप झाले नाही.यामुळे शेतकऱ्यांची शेती धोक्यात येऊन आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.मॅनेजरच्या मनमानी कारभार व मुजोरीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून कुंभेझरी रायपली,शेणगाव,खडकी, भारी,शंकरपठार,रायपूर,वणी याभागातील लक्ष्मण देवकते,राजकुमार सुरनार,यशोदा चव्हाण,रेखा कागने,अशोक तोगरे,रामा निकोडे,गोमा आत्राम,सुरेश कोटनाके,आया मडावी,मूसा पठाण,शंकर बिडगिरे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना अडवित कर्जापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न बँक मॅनेजरकडून होत असल्याचे दिसत असून मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शेतकऱ्याचे हाल करणाऱ्या सदर बँक मैनेजरांनी तात्काळ कर्ज मागणी अर्ज निकाली काढावे अन्यथा राष्ट्रवादी पद्धतीने आंदोलन करून बळीराजाला कर्जापासुन वंचित ठेवणार्‍या या बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस स्टेशन पाटणपुढे 30 सप्टेंबर रोजी 12 वाजता “बैठा आंदोलन” करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमूख आरूण निमजे,राकाँ नेते सय्यद आबीद अली,कैलास राठोड, वाघू उईके यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here