Advertisements
चंद्रपूर – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सतत जिल्ह्यात होणारे लॉकडाऊन बघता हातावर काम करणारे यांचे रोजगार बुडाले.
या परिस्थितीत चंद्रपूर शहरातील जनता आर्थिक परिस्थितीमुळे त्रासली आहे या त्रासातून चंद्रपूर महानगरपालिकेने नागरिकांचे गृहकरात 50 टक्के कपात करावी असे निवेदन कांग्रेस प्रदेश अनुसूचित जाति विभाग,ओबीसी विभाग व अल्पसंख्यक विभाग तर्फे आयुक्ताना निवेदन देउन मागणी करण्यात आली.या प्रसंगी अश्विनी खोब्रागडे, प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाति विभाग, उमाकांत धांडे ओबीसी अध्यक्ष, मलक शाकिर अल्पसंख्यक प्रदेश महासचिव व कार्यकर्ते उपस्थित होते.