शिवसेना पाठोपाठ भाजप नगरसेवकांचा ही जाहीर पाठिंबा

0
420
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच सदर कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर” येत्या 30 सप्टेंबर रोजी गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे.बोरकर यांच्या उपोषणाला समर्थनाचा ओघ सुरू असून शिवसेना पाठोपाठ आता भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी सुद्धा पाठींबा जाहीर केला आहे.
———————————————–
“गडचांदूर नगरपरिषदेकडून शहरातील प्रत्येक घरून ओला व सुखा कचरा उचल करणे,सार्वजनिक सौचालय साफसफाई करणे,कचऱ्याचे विलनिकरण करणे, शहरातील कचरा उचल करण्याकरिता व शहराची स्वच्छता ठेवण्या करिता या ठेकेदाराला वार्षिक ठेका देण्यात आला परंतु ठेकेदार,पदाधिकारी व अधिकारी यांनी संगनमत करून करार नाम्या नुसार काम न करता तांत्रिक मंजुरी नुसार बिलाची उचल करून लाखोंचा भ्रष्ट्राचार करीत आहे.तेव्हा सुजाण नागरिक मदन बोरकर यांनी उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली ती योग्य आहे.वरिष्ठांकडून चौकशी होत नसल्याने ते उपोषणाला बसत आहे.त्यांची मागणी रास्त असून आम्ही दोन्ही भाजपचे नगरसेवक बोरकर यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती या नगरसेवकांनी News34 ला दूरध्वनीवरून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here