घुग्गुस – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मृतकांचा वाढणारा आकडा याबाबत सध्यातरी प्रशासन गंभीरपणे बघत आहे परंतु या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव याकडे भाजप मात्र कमालीची दुर्लक्ष करीत आहे.
सभा, गर्दी जमविणे याबाबत बंदी असताना सुद्धा घुग्गुस भाजप आधीपासून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे, कारण प्रशासन कारवाई करण्यास संपूर्णतः हतबल झाले आहे.
लोकांना ज्ञान वाटायचं व स्वतः अडाणी सारखे वागायचं हीच भाजपची संस्कृती आहे का अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
जिल्ह्यात सध्या 7 दिवसांचा जनता कर्फ्यु सुरू आहे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोम्बर पर्यन्त हा कर्फ्यु सुरु असणार आहे, मात्र या जनता कर्फ्युत सुद्धा भाजप राजकीय खेळी खेळताना दिसत आहे.
26 सप्टेंबरला शहरातील प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लिमिटेड घुग्गुस यांच्या संचालकांनी महिलांची गर्दी एकत्र करीत ज्या महिला या सोसायटीच्या सदस्य आहे त्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
या छत्रीवर कमळाच चिन्ह व आमदार मुनगंटीवार यांचा फोटो आहे.
लोकनेते आमदार मुनगंटीवार यांनी स्वतः व नागरिकांना कोरोना काळातील नियम पाळण्याचा नेहमी सल्ला दिला मात्र त्यांचेच पदाधिकारी त्यांच्या आवाहनाला ठेंगा दाखवीत आहे.
घुग्गुस शहरातील बाधितांचा आकडा 150 च्या समोर गेला असताना आम्ही कधी सुधारणार नाही अशी भूमिका घुग्गुस भाजपने घेतली आहे.
कोरोनाच्या महामारीत भाजपने उघडली छत्री
Advertisements