चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त कोरोना बाधित या वयोगटातील

0
2854
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे आजपर्यंत एकूण 9 हजार 582 बाधितांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

या कोरोना संक्रमणाच्या सर्वात जास्त विळख्यात आलेले 19 वर्ष ते 40 वर्षे वयोगटातील एकूण 4580 बाधित आहे तर 41 वर्षे ते 60 वर्ष वयोगटातील एकूण 3 हजार 99 बाधित, 61 वर्षेवरील 906 बाधित आहे तर लहान बाळांमध्ये हे प्रमाण 0 ते 5 वर्षे वयोगटातील 178 बाधित, 6 वर्ष ते 18 वर्षापर्यंत एकूण 819 बाधित कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

Advertisements

9 हजार 582 मधून पुरुषांचे प्रमाण 5 हजार 929 तर महिलांमध्ये 3 हजार 653 जणांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे, यावर सध्यातरी नियंत्रन करणे प्रशासनाला सुद्धा अवघड जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here