भीम आर्मीचे बोरकर यांच्या उपोषणाला “शिवसेनेकडून पाठिंबा जाहीर

0
266
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील नगरपरिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच सदर कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर” येत्या 30 सप्टेंबर रोजी गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषण करणार आहे.बोरकरांच्या या उपोषणाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड यांनी शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे.
“घनकचऱ्याचा मुद्दा गावाच्या भल्यासाठीचा मुद्दा आहे.सदर योजनेत मोठ्याप्रमाणात घोळ झाला त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे.आणि गावात जर घाणीचे साम्राज्य निर्माण होत असेल,डेंग्यू सारखे रुग्ण वाढत असेल तर जनतेच्या हितासाठी अशावेळी शिवसेनाही सोबत राहील” असे मत नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा शिवसेना उप जिल्हाप्रमुख धनंजय छाजेड यांनी News34 कडे दुरध्वनीवरून व्यक्त केला आहे.
शहरात घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे ओला-सुखा कचरा गोळा करणे,त्याचे विलगीकरण करणे,सार्वजनिक शौचालय साफसफाई करणे,अशी विविध प्रकारची स्वच्छतेची कामे मागील वर्षी चंद्रपूर येथील “युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार संस्थेला देण्यात आली.काही महिने काम व्यवस्थीतरित्या सुरू होते. त्यानंतर मागील 6,7 महिन्यांपासून न.प. ने दिलेल्या हात गाड्या पूर्णपणे बंद केल्या व 6 टाटा एस गाड्याद्वारे काही मोजक्या भागातला कचरा उचलला जात आहे.ओला-सुखा कचरा विलगीकरण केल्या जात नाही,कमी कर्मचारी लावून काम सुरू आहे,नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जाते,शहरात अस्वच्छता पसरली असून डेंग्यू-मलेरीया सारख्या रोगामुळे शहरात नागरिक बळी पडत आहे.करारनाम्या नुसार त्याच्याकडून काम न घेता,परवाना काळ्या यादीत न टाकता कंत्राटदारा सोबत संगनमत करून करारनाम्यातील अटी व शर्तींना तिलांजली दिली जात आहे.शासनप्रशासन सदर महा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करीत असून निवेदन देऊन कारवाई तर सोडाच साधी चौकशी सुद्धा होत नसल्याने कारवाईसाठी अन्नत्याग उपोषणाचा मार्ग अवलंबल्याची माहिती मदन बोरकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here