लहान ट्रान्सपोर्ट चालकांना रोजगारासाठी ना !

0
333
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस – देशात कार्पोरेट प्रणालीवर सरकार भर देत आहे म्हणजेच आता व्यापार हा मोठ्या व्यापाऱ्यांनी करावा लहान व्यापारी हा उपाशीपोटी असला तरी चालेल.
सध्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठा व्यवसायी हा कमी किमतीत काम घेतो परंतु हे काम घेत असताना स्थानिक लहान ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना सुद्धा हे काम देणं गरजेचं असते परंतु आता ही संपूर्ण प्रणाली मोडकळीस आली आहे.
सध्या मोठे ट्रान्सपोर्ट चालक हे लहान व्यवसायिकांना काम देत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
घुग्गुस शहरात तब्बल 200 च्या जवळपास लहान ट्रान्सपोर्ट चालक आहे, त्यांनी या प्रणालीविरोधात आवाज उचलत आज सकाळी नायगाव चेकपोस्ट वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
लहान व्यवसायिकांची मागणी होती की आम्हाला सुद्धा मोठ्या ट्रान्सपोर्ट धारकांनी आधी सारखे काम द्यावे जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल,कारण आमच्यावर सुद्धा परिवाराची जबाबदारी आहे, वाहन चालकाचा वेतन, वाहनांची इंस्टॉलमेंट ह्या सर्व बाबी आमच्याशी जुळून आहे याकरिता वेकोली वणी क्षेत्रातील अधिकारी यांनी यावर तोडगा काढावा.
नायगाव चेकपोस्ट ही शिरपूर वणी जिल्हा यवतमाळ असल्याने शिरपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी चेकपोस्ट वर पोहचले.
वेकोली वणी क्षेत्रातील उप प्रबंधक त्रिपाठी जे आंदोलन स्थळी पोहचले मात्र ते मोठ्या व्यवसायिकांच बरोबर आहे, अशी भूमिका वारंवार ते घेत होते.
शेवटी पोलिसांच्या मध्यस्तीने हे आंदोलन संपुष्टात आले त्यांनी 2 दिवसांच्या आत मोठे ट्रान्सपोर्ट चालक व लहान ट्रान्सपोर्ट चालक यांची संयुक्त बैठक घेत तोडगा काढू असे आश्वासन दिले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here