चंद्रपूर – राज्यात कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडी निर्माण करीत सत्ता स्थापन केली.
यामध्ये कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्री बनल्याने आता कांग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कुणाच्या हाती जाणार यासाठी अनेकांनी धागेदोरे लावल्याची माहिती आहे.
कारण यंदाचा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष हा विदर्भाचा असणार आहे, सध्या या पदासाठी नाना पटोले, नितीन राऊत व विजय वडेट्टीवार हे प्रयत्नशील आहे.
खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी या विदेशातून परतले असताना याबाबत निर्णय होणार आहे.
महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्याने विदर्भात व राज्यात कांग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे, ही पिछेहाट आता भरून काढण्यासाठी पक्षश्रेष्ठी लवकरचं विदर्भातून चांगला व अनुभवी नेत्यांची निवड करणार आहे.
सध्या तरी गांधी घराण्याचे जवळील व नेहमी प्रामाणिक असलेले कामगार नेते माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांच्या नावावर विचार सुरू आहे, सोबतच मंत्री यशोमती ठाकूर यांचे नाव चर्चेत आहे.
माजी खासदार पुगलिया यांनी कामगार क्षेत्राच्या मार्फत लहान मोठ्या तब्बल 200 युनियन तयार केल्या ज्यामध्ये जवळपास 2 लाख कामगारांचा समावेश आहे, पक्षबांधणी चा चांगला अनुभव असलेले नरेश बाबू पुगलिया या पदाला न्याय देत राज्यात पक्ष उभारणी करीत कांग्रेसला नवसंजीवनी प्राप्त करून देणार.