अरेच्चा….! एकच ठेकेदाराला कोट्यवधींची कामे

0
1055
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेला तालुका कोरपना येथील नगरपंचायत बांधकाम ठेकेदार “भूषण देवराव ईटनकर” यांच्या विरोधात नगरसेवक सुहेल आबीद अली यांनी कोरपना पोलिस ठाण्यात तक्रार केली असून कलम 188,427,431,432 भादवी व सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे.यामुळे मनमर्जीने केलेली कामे आता ठेकेदार ईटनकर यांना भोवणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की,तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार अँड.संजय धोटे यांच्या प्रयत्नातून वैशिष्टपूर्ण कामांतर्गत 3 कोटींचा निधी कोरपना नगरपंचायतीला उपलब्ध झाला.इतर बाबी पूर्ण केल्यानंतर निविदेचे सत्र सुरू झाले.मात्र ऑनलाइन पद्धतीने निविदा घेण्याचे शासनाचे निर्देश असताना याठिकाणी अंदाजपत्रकीय दरात कोठ्यावधींची कामे एकच ठेकेदाराला देण्यात आली.मात्र एकाच ठेकेदाराकडून कामे करून घेण्या मागे संबंधितांचे हीत काय असावे हे मात्र कोडेच बनले आहे.सदर ठेकेदारांनी 2019 मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रिट पिटीशन दाखल केली. कोटींची कामे आदेशाच्या प्रतीक्षेत असताना नगरपंचायतीचे सिमेंट काँक्रेट रस्ते,नाली बांधकामे पूर्ण करण्याचा सपाटा लावून न्यायालय निर्देशाची अवहेलना व मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ले-आउट,तांत्रिक मार्गदर्शन,प्रशासनिक आदेश न घेता स्वतःच्या मर्जीने कामे करण्याची घाई करत मोठा गैरव्यवहार व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ठेकेदारांनी केल्याचा आरोप नगरसेवक सुहेल अली यांनी केला आहे.याचप्रकारे अंदाज पत्रकाच्या तरतुदीनुसार कामे झालेली नाही,शासनाच्या तांत्रिक मंजुरी प्रमाणे साहित्याचा वापर केलेला नाही,रेती ऐवजी दगडी चुरीचा सर्रास वापर करून निकृष्ट बांधकामे केली.विशेष म्हणजे काम करण्यापूर्वी कोणतीही तांत्रिक परवानगी यांनी घेतली नसून या बाबतीत मुख्याधिकारी व शाखा अभियंता अनभिज्ञ कसे ! हा मात्र संशोधनाचा विषय ठरत असल्याचे मत सुहेल यांनी व्यक्त केले आहे.नगरसेवकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शाखा अभियंता व लिपिकांनी 7 सप्टेंबर 2020 रोजी न.पं.क्षेत्रातील त्या वार्डांची पाहणी केली असता मुख्याधिकारी व प्रशासकीय आदेश नसतानाही कामे केल्याचे उघड झाले.मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदार ईटनकर यांना तात्काळ विनापरवानगी सुरू असलेली कामे बंद करून खुलासा सादर करण्याचे आदेश 10 सप्टेंबर 2020 रोजी दिले.ठेकेदारांनी केलेली अनेक कामे निकृष्ट व अंदाज पत्रकानुसार नसल्याने ठिकठिकाणी नाल्यांची पडझड आणि रस्ता उखडल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी झालेल्या अनेक कामांमध्ये घोळ असून अंदाज पत्रकाप्रमाणे कामे, निकृष्ट बांधकाम व प्रत्यक्ष मोजमाप यामध्ये मोठी तफावत असून मोजमाप मोठ्याप्रमाणात फुगवून,कामात तफावत व मोठा घोळ करून वेगवेगळ्या निधीमध्ये हेराफेरी,कॉन्सिल सभेच्या ठरावानुसार अंमलबजावणी न झाल्याने पंचायतीच्या शासकीय निधीचा गैरवापर,आर्थिक नुकसानीचा फटका झाल्याची लेखी तक्रार नगरसेवक सुहेल अली यांनी ठाणेदार कोरपना व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली असून तपास करून कारवाईची मागणी केली आहे.यामुळे न.पं. गोट्यात कमालीची खळबळ माजल्याचे चित्र असून “तो मी नव्हेच” या भुमीकेत प्रशासन दिसत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here