वेकोलीच्या अंडर मॅनेजरची वर्धा नदीत उडी

0
720
Advertisements

बल्लारपूर – काही दिवसांपूर्वी 11 सप्टेंबरला वेकोलीच्या सेफ्टी मॅनेजरने माजरी येथील पाटाला जवळील वर्धा नदीवर असलेल्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती, त्या घटनेला काही दिवस उलटत नाही तर पुन्हा 25 सप्टेंबरला वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील गौरी ओपन कास्ट चे अंडर मॅनेजर रामचंद्र बानोत वय 25 वर्ष यांनी सास्ती-बल्लारपूर मार्गावर वर्धा नदीच्या पुलावरून उडी मारली.
राजुरा पोलिस त्यांचा शोध घेत आहे मात्र अजूनही त्यांचा पत्ता लागला नाही.
नुकतीच बानोत यांना वेकोली येथे नौकरी लागली, त्यांचं अजून लग्न सुद्धा झालेलं नव्हतं, ते सास्ती येथील गेस्ट होऊस मध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी ते मानसिक तणावात असल्याची चर्चा वेकोली क्षेत्रात सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here