चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे नवे अधिष्ठाता डॉ अरुण हुमने यांनी स्वीकारला पदभार

0
880
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ मोरे यांची वादग्रस्त कारकीर्द अखेर चंद्रपुरातून संपुष्टात आली, डॉ मोरे यांना कोरोना काळातील व्यवस्थेवर नियंत्रण आणणे शक्य झाले नाही, सतत त्यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी यांचेपर्यंत जात होत्या, कामात काय चूक होते ते सुधारण्याऐवजी पुन्हा चूक करणे हे नित्याचेच काम बनले.
कंत्राटी कामगारांच्या वेतन संदर्भात त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती.
डॉ मोरे यांची बदली कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
डॉ मोरे यांच्या जागी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुरचे नवे अधिष्ठाता डॉ अरुण हुमने यांनी पदभार पण स्वीकारला आहे.
लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती प्रक्रियेतून डॉ हुमने यांची निवड केली.
सतत कोरोना बाधितांची वाढ व डॉक्टर्स कर्मचारी यांची रिक्त पदे या सर्व समस्या डॉ हुमने यांच्यापुढे आवाहन असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here