गडचांदूरात कोरोनापेक्षा डेंग्यू-मलेरियाचे संकट मोठे

1
386
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरात महिन्या भरात डेंग्यूने चार निष्पाप नागरिकांचे बळी घेतले तर कित्येक आजारी आहे.काही भाग वगळता बऱ्याच ठिकाणी नाली सफाई होत नसल्याने साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. किटकनाशक फवारणी होत नसल्याने नागरिकांमध्ये स्थानिक नगरपरिषदेच्या कारभारांविषयी संतापाची लाट पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोरोनापेक्षा डेंग्यू-मलेरियाचे संकट मोठे अशी भावना व्यक्त होत आहे.नाली नसल्याने घरासमोरच्या पटांगणात व बोअरवेल जवळ घाण पाण्याचे डबके साचले असून डेंग्यू आजाराची भीती निर्माण झाली आहे.अशी व्यथा प्रभाग क्रमांक एक येथील साईगृह निर्माण सोसायटीच्या नागरिकांनी News34 पुढे मांडली आहे.
प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह सत्ताधारी एक आणि विरोधी एक,असे तीन प्रतिनिधींचे निवासस्थान आहे.एकाच्या घरा शेजारीच चक्क कचऱ्याचे ढीगार पडून असल्याचे चित्र होते.डुकरांचा हैदोस पहायला मिळत असून वास्तविक पाहता शहरात बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कायम आहे.प्रभाग क्रमांक एक येथील साईगृह निर्माण सोसायटी(झंझाड सर)यांच्या घरा समोरील पटांगणात व बोअरवेल जवळ सांडपाणी साचून राहत असल्याने परिसरात डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला आहे.गेल्या कित्येक महिन्यापासून सदर समस्या मार्गी लावण्याचा तगादा सुरू असून आजपर्यंत याविषयी काहीच सकारात्मक घडले नाही अशी खंत व्यक्त करत साचलेला सांडपाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, लवकरात लवकर नालीची निर्मिती करावी आशी मागणी या सोसायटीतील रहिवासी प्रा.काळे, प्रा.माहूरे, परसुटकर सर आणि किराणा अध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशनचे सचिव प्रशांत गोरशेट्टवार यांच्या सह इतरांनी न.प.शासनप्रशासनाकडे केली आहे.

1 COMMENT

 1. गडचांदूर मध्ये गलिच्छ घाण सांडपाणी जमा झालेली ठिकाणे कितीतरी आहेत
  आणि याविषयी आम्ही बऱ्याच वेळा निवेदने देऊनही काही फायदा झाला नाही नगरपरिषद सुस्त झालेली आहे…
  डॉ. जोगी यांच्या रिकाम्या प्लॉटवर या पेक्षाही भयंकर सांडपाणी जमा झालेला आहे आणि नगरपरिषद त्याविषयी कधीच कारवाई करताना दिसत नाही
  माननीय जिल्हाधिकारी यांनासुद्धा याविषयी तक्रार दिलेली आहे
  त्यांनी पत्राद्वारे नगरपरिषदेला कारवाई करण्याची सूचना केली असून सुद्धा नगरपरिषदेने त्या पत्राची दखल घेऊन कारवाई केलेली नाही
  म्हणजे गडचांदूर ची नगरपरिषद किती मुजोर आहे असा याचा अर्थ होतो…
  यापुढे आम्ही महाराष्ट्र सरकारला न गडचांदुर नगर परिषद रद्द करून ग्रामपंचायत देण्यात यावी
  अशी मागणी करणार आहोत..

  कारण प्रगती तर कवडी ची नाहीच उलट
  नगरपरिषद बनल्यावर गडचांदुर ची दुर्गती झालेली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here