Advertisements
चंद्रपूर – केंद्र सरकार द्वारा नवीन कृषी विधेयक बिल मंजूर केल्यावर देशभरात याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या कायद्यामुळे बाजार समित्या पूर्णपणे उध्वस्त होणार आहे, शेतकरी हा कार्पोरेट घराणेशाहीचा गुलाम होणार, हे संपूर्ण बिल शेतकरी विरोधी आहे याला तात्काळ केंद्र सरकारने परत घ्यावे अन्यथा आंदोलनाद्वारे या बिलाचा लोकशाही मार्गाचा अवलंब करून विरोध करू असा इशारा भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी तर्फे देण्यात आला आहे.
सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी तपन कुमार रॉय, विदर्भ संपर्क प्रमुख शेखर तावाडे, जिल्हाध्यक्ष डी. एस. माथने, विदर्भ उपाध्यक्ष सुशील बारसिंगे आदि उपस्थित होते.