गडचांदूर भाजपतर्फे “पंडित दिनदयाल उपाध्याय” जयंती उत्साहात साजरी

0
195
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
प्रखर राष्ट्रवादी,एकात्म मानववादाचे प्रगतशील विचार जनमाणसात रुजवणारे मग्न विचारवंत,कुशल संघटक,एकेकाळी भारतीय जनसंघाचे अध्यक्ष राहिलेले “पंडित दिनदयाल उपाध्याय” यांची जयंती गडचांदूर शहर भाजप कार्यालय,प्रभाग क्रं.3 व 2 मधील नगरसेवक कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम पंडितजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले.जयंतीच्या निमित्याने शहरातील कार्यकर्त्यांनी स्वत:च्या घरांवर पक्षाचे ध्वज उभारले तर काही गरजूंना धान्य कीट वाटप करण्यात आले.सदर जयंती कार्यक्रमात भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,जेष्ठ नेते महेश शर्मा, शिवाजी सेलोकर,माजी नगरसेवक निलेश ताजने,नगरसेवक रामसेवक मोरे,अरविंद डोहे,सत्यदेव शर्मा,राकेश अरोरा,साईनाथ पोतनूरवार,परशुराम मुसळे,विनोद कावटकर,सुनील जोगी, प्रकाश कटीस्कर,माजी नगराध्यक्षा सौ.विज्यालक्ष्मी डोहे,सौ.रंजना मडावी, सौ.सपना सेलोकर आदी भाजपा कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here