क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करा – आमदार धोटे

0
249
Advertisements

राजुरा  : राजुरा, कोरपना व गोंडपिपरी शहरातील क्रिडा संकुलाचे दुरुस्तीचे काम गेली अनेक वर्षा पासून रखडलेले आहे. शहरातील क्रिडा प्रेमींची मागणी लक्षात घेऊन क्रिडा प्रेमींना याची सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने राजुराचे कर्तव्यदक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिनांक २२ सप्तेम्बर २०२० रोजी राजुरा येथे बैठक आयोजित करून तातडीने क्रिडा संकुलाची दुरुस्ती करून युवकांना संकुल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा क्रिडा अधिकारी मुस्ताक यांना दिल्या आहेत.
राजुरा शहरालगत सुमारे ५ एकर परिसरात तालुका क्रिडा संकुल आहे. इनडोअर खेळ खेल्न्यासती मोठे हॉल आहे मैदानी कसरतीसाठी मोठे मैदान उपलब्ध आहे परंतु क्रिडा विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याने या संकुलाची देखभाल दुरुस्ती होत नाही. क्रिडा संकुलाचे परिसरात झुडपे व गवत वाढलेले आहे. क्रिडा प्रेमींना व पोलीस प्रशिक्षण भरतीमधील युवकांना तालुक्याचे ठिकाणी सुविधा असूनही याचा लाभ घेता येत नाही. शासनाचे लाखो रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले जनउपयोगी वास्तू धूळ खात पडलेली आहे. तातडीने क्रिडा संकुलाची दुरुस्ती करून युवकांकरिता संकुल सुरु करण्याबाबतच्या सूचना राजुरा विधासभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा क्रिडाअधिकारी मुस्ताक यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here