आरोपी नाही मात्र अवैध दारू मिळाली

0
328
Advertisements

ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात नवीन जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचं आगमन होताच, दुहेरी हत्याकांड, अवैध दारू तस्करीच्या घटना वाढत असून यावर काय कठोर पाउले उचलता येणार याकडे आता नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.
जिल्ह्यात सध्या अवैध दारू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यावर आज पर्यंत आळा बसलेला नाही.
ब्रह्मपुरी पोलिसांना अवैध दारू तस्करीची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचला व नान्होरी मार्गावर पाळत ठेवताना संशयास्पद कार शहराकडे येताना दिसली, पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र चालक कार सोडून जंगलाच्या दिशेने पळाला, पोलिसांनी गाडीची चौकशी केली असता त्या वाहनात 20 पेटी देशी दारू किंमत 2 लाख तर एकूण 5.50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here