चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने 7 दिवसांचा जनता कर्फ्यु घोषित केला होता.
जनता कर्फ्युच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत जनता कर्फ्युत आपली दुकाने बंद ठेवली.
जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा 1 आठवड्याचा कर्फ्यु जाहीर केला होता, आज जनता कर्फ्युचा पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी प्रतिष्ठाने बंद होते.
जनता कर्फ्युने कोरोनाची साखळी तुटो की न तुटो मात्र सामान्य जनतेचं कंबरडे नक्कीच मोडेल, हाताला काम करणाऱ्या नागरिकांचा प्रशासन कधी विचार करीत नाही, जनता कर्फ्युची घोषणा होताच बाजार जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडून जातात ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागते.
7 दिवसांच्या कालावधीत गोर गरीब जनतेचं काय? पुन्हा जनप्रतिनिधी त्यांना भोजनवाटप करणार का?