चंद्रपूर – खाजगी रुग्णालयात कोरोना काळात नागरिकांकडून सिटी स्कॅन तपासणीसाठी अवाजवी दर आकारण्याचा जणू लूट सुरू झाली होती, संपूर्ण राज्यभरात नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला.
या संदर्भात नागरिक व जनप्रतिनिधी कडून मोठ्या प्रमाणात राज्य शासनाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक समिती गठीत केली व त्याचा अहवाल प्राप्त होताच राज्यभरात सिटी स्कॅनचे दर हे खालीलप्रमाणे असणार आहे असे टोपे यांनी जाहीर केले.
यापुढे 16 स्लाइसचे २ हजार रुपये, तर 16 ते 64 स्लाइसचे दर २ हजार ५०० रुपये, तर 64 स्लाइस पेक्षा जास्त असल्यास त्याचे दर फक्त ३ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. या पुढे खासगी डॉक्टरांनी जर जास्त शुल्क आकारले तर त्यांच्यावर कारवाई होईल, हे दर खाजगी रुग्णालयांनी सिटी स्कॅन परिसरात किंवा रुग्णालय आवारात लावणे बंधनकारक असणार आहे, जर कुणीही अवाजवी दर रुग्णांकडून घेतल्यास त्यावर कडक कारवाईचे अधिकार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व शहरी भागात आयुक्तांकडे असणार आहे.
अशी घोषणा टोपे यांनी केली. त्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.