चंद्रपूर भाजपचा तो दावा फोल

0
1061
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्‍हयातील कोविड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी शकुंतला लॉन येथे उभारण्‍यात येणा-या 700 खाटांच्‍या जंबो कोविड रूग्‍णालयाच्‍या उभारणीवरून अकारण भारतीय जनता पार्टीला गोवले जात असून याच्‍याशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही. भाजपा हा दीन, दुर्बल, शोषित, पिडीत जनतेच्‍या हितासाठी, कल्‍याणासाठी कार्य करणारा पक्ष आहे. आम्‍ही शासकीय पातळीवर 1000 खाटांचे रूग्‍णालय कोविड रूग्‍णांना निःशुल्‍क उपचार देण्‍यासाठी खनिज विकास निधीतुन स्‍थापन करावे अशी मागणी केली आहे व ही मागणी पूर्ण करावी अन्‍यथा आम्‍ही आंदोलनाची भूमीका घेतली आहे, असे भाजपातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

शकुंतला लॉन येथे उभारण्‍यात येणा-या 700 खाटांच्‍या जंबो कोविड रूग्‍णालयाच्‍या उभारणीवरून विविध वृत्‍तपत्रांमध्‍ये बातम्‍या प्रसिध्‍द होत असून यात भाजपाची अकारण बदनामी केली जात आहे. भाजपाचे महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी शकुंतला लॉन येथील जंबो हॉस्‍पीटल संदर्भात कोणताही प्रस्‍ताव महानगरपालिकेला सादर केलेला नाही. त्‍याचप्रमाणे महानगरपालिकेने यासंदर्भातील प्रस्‍तावाला दिलेली तत्‍वतः मान्‍यता ही प्रशासकीय पातळीवरील बाब असून त्‍याच्‍याशी पदाधिका-यांचा कोणताही संबंध नाही. 

Advertisements

असा दावा चंद्रपूर भाजपने प्रसिद्धीपत्रकातून केला आहे, परंतु भाजपचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला ते म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकीकडे भाजप दावा करते की आमचा त्या खाजगी हॉस्पिटल सोबत म्हणजेच भाजप शहर अध्यक्ष डॉ गुलवाडे यांचा काही संबंध नाही परंतु 22 सप्टेंबरला पालिकेतर्फे पत्रकाद्वारे खाजगी जम्बो कोविड हॉस्पिटल ही काळाची गरज असे पत्रक जाहीर केले त्यामध्ये स्पष्ट शब्दात भाजप महानगर अध्यक्ष डॉ गुलवाडे व डॉ वासाडे यांनी खाजगी जम्बो हॉस्पिटल साठी प्रस्ताव सादर केले व त्याला मान्यता सुद्धा देण्यात आली असा उल्लेख करण्यात आला आहे, असे असताना सुद्धा चंद्रपूर भाजप चंद्रपूरकरांची उघडपणे दिशाभूल करीत आहे.

नागरिकांकडून भरमसाठ टॅक्स वसूल करायचा व पालिकेद्वारा त्यांना आरोग्याच्या बाबती सुविधा उपलब्ध करायच्या नाही व वरून खोटं बोलून नागरिकांची दिशाभूल करायची हे कुठलं राजकारण आहे.

चंद्रपूर महानगरपालिका यांच्या पत्रकात असलेला उल्लेख

महानगरपालिका येथिल चांगल्या प्रॅक्टिस विचारात घेऊन महानगरपालिका स्तरावर हॉटेल व्यावसायिक, लॉन मालक, सभागृह संचालक तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आणि समाजाची वैद्यकीय सेवांची नितांत गरज लक्षात आणून देण्यात आली. या दोन्ही घटकांनी एकत्र येऊन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्या असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला अनुसरून डॉ.मंगेश गुलवाडे आणि डॉ. अनुप वासाडे यांनी प्रस्ताव सादर केले असून त्यांना तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here