गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स नवी दिल्लीतर्फे भारतीय मानवीय व भारतीय उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित मो.सिबतैन कादरी यांचा गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कोरोना महामारीत कादरी यांना समाज सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला असून कादरी हे तमिळनाडूतील भारतीदास विश्वविद्यालय तिरूचिरापल्ली येथे एमएससी पर्यावरण विज्ञान व प्रौद्योगिकी छात्र आहे.6 महिन्यांसाठी यांची सेमिस्टर प्रोजेक्टसाठी निवड झाली होती.आचार्य डॉ.एन.मणिमेकलै कोविड-19 कॉन्सीलच्या समुपदेशकासह विद्यापीठात शिक्षण घेत आहे.इतर राज्यातील फसलेल्या 25 विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने यांना घरी पोहचविण्यात कादरी यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी येथील आदिवासी वस्तीतील वंचित लोकांना मदत म्हणून डॉ. अजिंक्य रमेश चकोर यांच्या “अन्नमित्र: फीड इनिशिएटिव्ह बाय कॉलेज ग्रॅजुएट्स” ला व्हॉट्सअॅप संपर्काद्वारे 6,014 रूपये व 20 घरांना आठवड्याचे रेशन दीले.अशा विविध उल्लेखनीय सामाजीक कामांची दखल घेऊन इंडियन बुक ऑफ रेकॉर्डद्वारा नियुक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता डॉ.जिवीआरएसएस वरा प्रसादच्या निर्णयानुसार 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2020 रोजी कादरी यांना पुरस्कार देण्यात आले.गडचांदूर शहराचे नाव उंचावल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत असून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सिबतैन कादरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम,गटनेता तथा बांधकाम सभापती विक्रम येरणे,नगरसेवक राहूल उमरे,अरविंद मेश्राम,पापय्या पोन्नमवार,काँग्रेस शहराध्यक्ष संतोष महाडोळे,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रूपेश चुदरी व इतरांची उपस्थिती होती.
शहर काँग्रेसतर्फे “सिबतैन कादरी” यांचा सत्कार
Advertisements