बल्लारपूर:-स्थानिक गुन्हे शाखेच्या( LCB)पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मूर्तिजापूर जी, अकोला हुन महिंद्रा पिकअप वाहन क्र, mh-10-cr-5950या वाहनाने देशी दारू ची खेप येत असल्याची खात्री लायक माहिती मिळाली. त्या आधारे बल्लारपूर पेपर मिल समोर LCB पोलिसांनी सापळा रचून चंद्रपूर हुन येत असलेल्या महेंद्र पिकअप ला थांबवून झडती घेतली असता त्यात 26 पांढऱ्या बोऱ्यात कांदे व 34 पांढऱ्या बोऱ्यात अवैध देशी दारू आढळून आली.त्यांना जप्त करून पोलीस ठाण्यात आणुन दोन्ही आरोपी चालक शुभम प्रमोद मिराशे(22) बाजूला बसलेला अभिलाष प्रभाकर वैद्य दोनही रा, धानोरा वैद्य, ता,मूर्तिजापूर जी, अकोला यांना ताब्यात घेऊन कलम 65 अ 83 गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई 23 सप्टेंबर चा रात्री1ते 2 च्या दरम्यान करण्यात आली.10लाखाची देशी दारू, 9लाखाची बोलेरो महिंद्रा पिकअप, एक मोबाईल,आणि कांदे असे मिळून अंदाजे20लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार शिवलाल भगत यांच्या नेतृत्वाखाली API विनीत घागे करीत आहे.
अवैध दारू तस्करीची गुप्त सूचना एलसीबीला मिळते परंतु बल्लारपूर पोलिसांना याबाबत माहिती नसते, मागे पालकमंत्री यांनी जाहीर केले होते की कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुसऱ्या पोलीस पथकाने अवैध दारू पकडली तर संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात येणार परंतु आज पर्यंत अशी कारवाई कुणावर करण्यात आली नाही.
नेते फक्त घोषणांचा पाऊस पडतात मात्र त्यावर शिक्कामोर्तब कधी करीत नाही.