अफवा सोडा सहकार्य करा

0
392
Advertisements

चंद्रपूर  – कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेस चंद्रपूर शहरात सुरवात झाली असून आरोग्य पथकांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरवात केली आहे. अफवांना बळी न पडता मोहीम यशस्वी करण्यास नागरीकांनी आरोग्य पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
अभियानातंर्गत शहरातील मोहल्ल्यात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहे. हे पथक तपासणीसाठी घरी आल्यानंतर नागरीकांनी त्यांना कुटूंबाची सविस्तर माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच कुटूंबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास अथवा कोणताही जुना आजार असल्यास त्याची खरी माहिती द्यावी, जेणेकरुन आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यास प्रशासनाला मदत होईल.
 या अभियानात काही गोष्टी प्रकर्षाने समोर येत आहेत आणि त्या म्हणजे समाज माध्यम युनिव्हर्सिटीतुन बाहेर पडलेल्या अफवा.
अफवा १ : महानगरपालिका, डॉक्टर यांनी प्रत्येक रुग्णामागे दीड लाख रुपये मिळतात.
अफवा २ : मेल्यानंतर दीड लाख रुपये मिळतात म्हणून डॉक्टर मुद्दाम रुग्णांना मारीत आहेत.
अफवा ३ : रुग्ण  मेल्यानंतर अवयव काढून घेण्यात येतात .
अफवा ४:  शासकीय रुग्णालयात गेल्यास मृत्यू होतो.

कुठल्याही मृत रुग्णामागे शासनाकडुन पालिकेला किंवा डॉक्टरला पैसे दिले जात नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण मेल्यानंतर त्याचे कोणतेच अवयव कामी येत नाही.  कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाचे शव- विच्छेदन करण्यास मनाई आहे.  मृत देहापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी मृत देहाची विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केली जाते. त्यांचा अंतिम विधी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येतो.  कोरोना बाधित रुग्णाचे मृत देहाचे अंत्यविधी करण्याची जवाबदारी  महानगर पालिकेकडे देण्यात आली आहे.  रुग्णालयात डॉक्टर, सिस्टर, आरोग्य कर्मचारी हे सर्व आपले कर्तव्य करीत आहेत, त्यांना सुटी घेता येत नाही. शासकीय रुग्णालयातील अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊन बाहेर पडले आहेतच.
चुकीच्या व अर्धवट माहितीमुळे गैसमज पसरवून कोरोना योध्यांचे मनोबल खचु देऊ नका,आज अनेक कोरोना योद्धे कोरोनाच्या युद्धात शहिद झाले आहे. रोज कोणी ना कोणी कोरोना योद्धा कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. पण ते जीवाची पर्वा न करता सामान्य माणसासाठी आरोग्य सेवा देत आहेत.ज्या काळात सर्वांनी मिळून कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ आहे त्याच काळात कोरोनाला न हरवता आपण  कोरोना योध्याला हरवण्याचे काम करू नये . कोरोना योद्धे हारले तर आपणही हरू हे लक्ष ठेवण्याची वेळ आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here