चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा कोविड रुग्णाच्या आकड्यावर अंदाज

0
619
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्याच्या ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केल्यावर जिल्हाधिकारी गुल्हाने निरुत्तरीत झाले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची माहिती देण्यासाठी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते.
पत्रकार परिषदेत जेव्हा जिल्ह्यातील ढिसाळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे उत्तराचा जणू दुष्काळच पडला होता.
जिल्ह्यातील वैधकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी कोविड रुग्णांची सेवा देण्यास नकार दर्शविला आहे तर त्या डॉक्टरांवर काय कारवाई करणार किंवा नोटीस दिले आहे याचं उत्तर मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्हतेच.
इतकेच नव्हे तर जिल्हा प्रशासन त्या डॉक्टरांसमोर पूर्णपणे हतबल झाले आहे असा प्रश्न सुद्धा करण्यात आला तेव्हा सुद्धा उत्तर नव्हते.
सध्या जिल्हा प्रशासन फक्त कोविड रुग्णाचा पुढचा आकडा किती असणार याचे अंदाज सांगत आहे परंतु त्या वाढत्या रुग्णसंख्येवर प्रशासनाचे नियोजन काय हे याचा अंदाज अजूनही प्रशासनाने लावला नाही.
ज्या डॉक्टरांनी कोविड रुग्णांना सेवा देण्यास नकार दिला यांचेवर कडक कारवाई व्हायला हवी म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेज मधून गलेलठ्ठ पगार द्यायचा पण सेवा मात्र खाजगी जम्बो हॉस्पिटलला हे तर योग्य नाही.
नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी जेव्हा हे डॉक्टर्स झटकून देत आहे ते सुद्धा जास्त पैश्याच्या मोहात यांचेवर कारवाई प्रशासनाने कारवाई करायला हवीच, परंतु तसे प्रशासन करण्याच्या तयारीत मुळीच नाही.
नागरिकांचे आरोग्य व उपचार योग्य प्रकारे मिळावा यासाठी देशातील चौथा आधारस्तंभ प्रशासनाला जाब विचारताना दिसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here